वाचाल तर वाचालच पण ऐकाल तरी ही वाचाल
तशी मलाही वाचनाची जास्त आवड नव्हती आणि नेमके काय वाचायचे हे हि माहीत नसायचे. शालेय आणि विद्यालयीन जीवनात अभ्यासानंतर जो काही वेळ मिळायचा तो खेळणे, भटकणे आणि इतर छंद जोपासण्यात गेला. मला आठवतंय शाळेत असताना माझ्या मित्रांनी माझ्या वाढदिवसाला पुलंचं 'व्यक्ती आणि वल्ली' हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. आमच्या शाळेच्या जवळ एका रद्दीवाल्या काकांकडे जुनी वापरलेली पुस्तके नवीन कव्हर घालून आणि व्यवस्थित बायडिंग करून मिळत. त्यांनी तिथूनच ते पुस्तक घेतले होत. तिथूनच माझी पु ल आणि त्यांच्या साहित्याची ओळख झाली. आतापर्यंत मला आवडलेल्या भेटवस्तूंपैकी ती एक भेट म्हणता येईल, माझ्या मित्रांचेही धन्यवाद. आमच्या शाळेतल्या ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके होती. प्रत्येक वर्गाला ठरवून दिलेल्या दिवशी दर आठवड्याला पुस्तके बदलून मिळायची. एखादं खरंच खूप चांगलं पुस्तक मित्राने सांगितलं तरच ते मी वाचायची मेहनत घ्यायचो. नंतर नोकरी लागल्यावर हातात माउस, डोळ्यासमोर कंम्प्युटर स्क्रीन आली आणि पुस्तकाशी, लेखनाशी, वाचनाशी पूर्णपणे संबंध तुटला. एवढंच काय, माझा सर्वात आवडता छंद चित्रकला, यालाही वेळ मिळेनासा...