कोकण सायकलिंग अनुभव
साधारण वर्षभरापूर्वी कोकणात कोस्टल रोडवर सायकलिंग करायचं अस डोक्यात आलं आणि मित्रांना सांगितलं. काही महिन्यांनंतर नियमित सायकलिंग करणाऱ्या मित्रांशी सविस्तर चर्चा झाली आणि प्लॅन ठरवला. दोन महिन्यांपूर्वी तारीख ठरली आणि तशी प्रॅक्टिस ही सुरू झाली. मी, हर्षद आणि जयेश आम्ही तिघेही पहिल्यांदाच असे सलग आठवढाभर अनोळखी रस्त्यांवर सायकलिंग करणार होतो. आम्हा तिघांच्या सायकलीही वेगवेगळ्या प्रकारच्या. किती आणि काय सामान घ्यायचं, त्याच पॅकिंग कसं करायचे, किती वेळ आणि कोणत्या वेळी सायलिंग करायची, कोणता रूट चांगला आहे, कोठे थांबायचे वगैरे वगैरे असे खूप सारे प्रश्न होते, त्यावर चर्चा केली आणि शेवटी एकवीस डिसेंबरला सुरुवात झाली.
पहिल्या दोन दिवसात जास्त अंतर आणि खराब रस्ते अनुभवल्यावर हे सर्व कठीण जाईल असे वाटत होते पण आम्ही केलेली प्रॅक्टिस तिथे कामाला आली. कोकण कोस्टल रोड आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चढ उताराचा ठरला. खराब रस्तेही होते बहुतेक ठिकाणी पण तिथल वातावरण आणि निसर्गसौन्दर्य सर्व थकवा दूर करायचे.
सायकल वर प्रवास करताना अनेक निर्मनुष्य ठिकाणी खूप वेळा आपण रस्त्यावर एकटेच असतो, तिथल्या विविध प्राणी, पक्षी, झाडे आणि इतर अनेक हालचाली आपल्याला जाणवत असतात जे आपण बाईक किंवा चार चाकी वाहनात प्रवास करून नाही अनुभवू शकत. थकल्यावर किंवा पाणी पिण्यासाठी आपण वेळोवेळो थांबतो, कधी लोकांशी बोलतो कधी ते आपली चौकशी करतात. इतर मोटरबाईक राइड ना आपण फारच कमी लोकांशी जोडले जातो. आणखी किती अंतर बाकी आहे, रस्ता कसा आहे किती पाणी राहिलंय, कुठे स्टॉप घ्यायचा या सर्वांचे गणित करूनच पुढे कसे जायचे हे आम्ही ठरवत होतो. आपल्या आधीच्या पिढ्या सायकलवर कसे प्रवास करत असतील याचाहि आम्हाला अंदाज आला.
ठरलेल्या वेळेत अंतर कापणे हाच केवळ आमचा उद्देश नव्हता तर रस्त्यात जिथे जमेल त्या मंदिर, गड -किल्ले आणि समुद्र किनार्याना आम्ही भेटी दिल्या त्यामुळे संपूर्ण प्रवास बोअरिंग नाही वाटला. वाटेत आम्हाला इतर काही सायकलपटूही भेटले, त्याचाशी गप्पा मारल्या. पुढचा प्लॅन काय आहे, आधी काय काय केले असे सर्व अनुभव शेअर केले. महत्वाचं म्हणजे दोन तीन ठिकाणी काही वरिष्ठ लोक स्वतःहून भेटले ज्यांनी २५-३० वर्षांपूर्वी हा असा कोकण प्रवास सायकल वर केला होता. त्यांच्याशी बोलल्यावर तर आणखीनच कॉन्फिडन्स वाढला. कोणत्याही गावात पोहचताच लहान थोरांचे हाय, बाय आणि गुड मॉर्निंग आम्हाला मानसिक बळ देत होते. तिथले घरगुती रुचकर जेवण आणि होम-स्टे मुळे आमची पोटाची आणि झोपेची चांगली सोय झाली.
आठ दिवस, पाच जिल्ह्यात, सहाशेहून अधिक किलोमीटरचा हा प्रवास खूप काही शिकवणारा होता. मुख्य म्हणजे तो सायकल वर केला हे खूप चांगले झाले. आपल्या देशातल्या आमदार-खासदारांना असच सायकल वर प्रवास करायला लावा त्यांना नक्कीच रस्ते आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे महत्व कळेल. आमच्या नशिबाने म्हणा किंवा योग्य तयारी आणि शिस्तबद्ध प्रवास केल्याने आम्हाला कोणालाही दुखापत अथवा आमच्या सायकलींना काही झाले नाही आणि संपूर्ण प्रवास योजने नुसार पार पडला.
ह्या संपूर्ण अनुभवाबद्दल सविस्तर लिहायचे आहे (वेळ मिळाला तर) पण तूर्तास एवढेच. तोपर्यंत कीप सायकलिंग...
वैभव जगताप

Comments
Post a Comment